आकापूर ते दत्त मंदिर मार्गावरील गिट्टीमुळे वाहनांची दुर्दशा @रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रतीक्षा

59

जनतेला रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रतीक्षा  मार्गावरील गिट्टीमुळे वाहनांची दुर्दशा
मूल तालुक्यातील  आकापूर ते दत्त मंदिर या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता रस्त्याचे डांबर उखडल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. आता तर या मार्गावर सायकलही सुरळीत चालत नाही. रस्त्याची गिट्टी पूर्णपणे उखडली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सायकल व इतर वाहनांचे टायर खराब होत आहेत. अशा स्थितीत हा जीर्ण रस्त्याची दुरुस्ती कधी होणार, असा सवाल उपस्थित होत असून स्थानिक नागरिकांना या रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रतीक्षा लागून आहे.
ग्रामपंचायतीने या मार्गावर पथदिवेही लावले नाहीत. या रस्त्यावरील दुकानदार स्वखर्चाने दुकानासमोरील रस्त्यावर दिवे लावताना दिसत आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे, तर मंदिर व्यवस्थापनावर भाजपचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दोघांमुळे रस्त्याचे काम अधांतरी अडकले असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था नाही. याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यापूर्वी करणार दुरूस्ती
या रस्त्याच्या संदर्भात मूलचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांशी या संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे दोन्ही बाजूंनी डांबरीकरण व मजबुतीकरण केले जाईल. असे आश्वासन दिले आहे.