Home आपला जिल्हा Breaking News महिलेला अश्लील हातवारे व शिवीगाळ करणे भोवले

महिलेला अश्लील हातवारे व शिवीगाळ करणे भोवले

129

वास्तव्याचे घर पडल्याने निवाऱ्याची सोय म्हणून समाज भवनात बस्तान मांडला खरा; परंतु दारूच्या अधीन गेलेला तो महिलांना अश्लील हातवारे व शिवीगाळ करून लज्जीत करीत होता.

महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिवदयाल नीलकंठ बांबोळे (४५, रा. नांदगाव, ता. मूल) याला अटक केली.
मूल पोलिस ठाणेअंतर्गत बेंबाळ चौकीच्या हद्दीतील मौजा नांदगाव येथील शिवदयाळ नीलकंठ बांबोळे याचे स्वतःचे घर पडल्यामुळे दोन वर्षांपासून समाज भवनात राहत आहे.

परंतु शिवदयाळ याला दारूचे व्यसन जडले. नेहमीच वार्डातील लोक व महिलांसोबत तो भांडत असल्याच्या कारणावरून नेहमीच्या जाचाला कंटाळून पत्नी माहेरी गेली. तरीपण दिवसेंदिवस आरोपीची हिंमत वाढल्याने वार्डातील महिलांकरिता त्रासदायक झाले.

२५ एप्रिलला फिर्यादी महिला आईच्या घराकडे जात असताना आरोपी शिवदयाळ बांबोळे हा समाज मंदिराच्या पायरीवर उभे राहून अश्लील इशारे व शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून

पोलिसांनी कलम ३५४ (अ), २९४, ५०९, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी करीत आहेत.