पित्याने केला मुलाचा खून @राजोली  येथे

785

मूल तालुक्यातील राजोली येथील गणेश विट्टल चौधरी वय 31 वर्षे हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली, घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता, दरम्यान 09/04/2023रविवारी पहाटे 5 वाजता दरम्यान त्याने दारुच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला, आणि स्वताच्या गळावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना रविवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान राजोली  येथे घडली. गळा दाबुन हत्या केलेल्या पित्याने स्वतःच्या गळावर चाकुने वार करुन आत्महत्या  करण्याचा प्रयत्न केला. प्रियांशु गणेश चौधरी वय 3 वर्षे  वय 31असे गळा दाबुन खुन केलेल्या बालकाचे नांव आहे तर गणेश विट्टल चौधरी वर्षे असे पोटच्या मुलाचा खुन करणाऱ्या पित्याने नांव आहे.

सदर घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन पंचनामा केला असुन जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.