सोमनाथ सफारी गेट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

152

मूल, ता. ५ : ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यातंर्गत येत असलेल्या बफर झोन क्षेत्रातील सोमनाथ सफारी गेट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत सापडले आहे. तीन महिन्यांपासून काम पूर्ण होवून सज्ज झाले आहे. तरीही उदघाटनाची तारीख गेली कुठे ? नेमकी माशी कुठे शिंकली, असा प्रश्न विचारल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे उद्घाटनाची तारिख घेण्याची नेमकी अडचण कोणती, यासह अनेक प्रश्न वर्तुळात चर्चिल्या जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्याचे ठिकठिकाणी विविध गेट सुरू झालेत. ऑनलाइन बुकींगच्या माध्यमातून त्याठिकाणी प्रवेश प्रक्रियासुद्धा सुरू झाली. अनेक दिवसांपासून सोमनाथ गेट सुरू करण्याची नागरिकांची मागणी होती. ती मागणी पूर्णत्वाससुद्धा आली.

वनमंत्रीसुधीर मुनगंटीवारअसल्याने त्यांनी तत्काळ नागरिकांच्यामागणीला होकार दर्शविला. सोमनाथसफारी गेटच्या कामाला सुरुवातसुद्धा झाली. आज तीन महिन्यांपासून सोमनाथ सफारी गेट पूर्ण होवून पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. एका खोलीचे बांधकामसुद्धा येथे झाले आहे.

सोमनाथ हे शिवलिंग देवस्थान आणि नैसर्गिक धबधबा असलेले पर्यटन ठिकाण असल्याने या ठिकाणी पर्यटकांची पसंती अधिक राहण्याची जास्त शक्यता आहे. सोमनाथ आणि आमटे फार्मच्या परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे.त्यामुळे पर्यटकांना वाघांसह इतरप्राण्यांचे दर्शन होण्याची जास्त शक्यता आहे. साठ किलोमीटरच्या परिसरात भती राहणार आहे.

अंतर्गत भागात फिरण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले आहे. जिप्सी तयार आहेत. फक्त उदघाटन केव्हा केल्या जाईल याबद्दल मोठी साशंकता निर्माण झाली आहे. २६ जानेवारीला सफारी गेटचे उद्घाटन केल्या जाईल अशी मोठी आशा होती. परंतु, ती तारीखसुद्धा हुकली. तालुक्यातील सर्व वनकर्मचाऱ्यांसह पर्यटकांना तारखेची प्रतीक्षा करावी लागत आहे. सोमनाथ सफारी गेटचे उद्घाटन लांबणीवर न टाकता तत्काळ करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.