मूल (वा.).दरवर्षीच्या उन्हाळ्यातच ग्राहकांना येणाऱ्या विजबिलामुळे खिशावर ताण पडतो. त्यातच April ,May महिन्याच्या बिलामध्ये महावितरणने इंधन अधिभार लावण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना याचा आणखी मोठा फटका बसणार आहे. घरगुती ग्राहकांच्या वीजदरात ८ ते १० टक्यांचा फरक पडणार आहे. त्यातच १६ टक्के विद्युत शुल्काची भर घातली तर ही वाढ आणखी मोठी असणार आहे. विशेष म्हणजे नवे दर महावितरण व एसएनडीएलच्या या दोन्ही ग्राहकांना लागू असतील.
महावितरणानेआपली तूट भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यापासून नवीन वीज दरवाढ लागू केली आहे. नवीन विज बिल धोरणाने घरगुती, कृषी, वाणिज्यिक वीज बिलात सरासरी 37 ते 52 टक्के टक्यांपर्यंत वीज बिलात वाढ होणार असून यामुळे ग्राहकांना वीज बिल भरताना मोठी दमछाक होणार आहे. 2023-24 वर्षांसाठी 2.9 टक्के आणि 2024-25 वर्षांसाठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. अधिभार जोडल्यास घरगुती ग्राहकांवर 10.48 ते 34.82 टक्के एवढा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यामुळे ग्राहकांना उन्हाळ्यातच विजेचा मोठा शॉक बसला आहे.
वीज बिलाची वसुली करीत असताना ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या वीज बिल देयकात मोठी तफावत आहे. योग्य मीटर वाचन न करता ग्राहकांना वीज बिल पाठवल्या जाते. तर काही ठिकाणी ग्राहक विजेची चोरी करीत असतात हे सुद्धा महावितरण पुढे मोठे आव्हान आहे. त्यामळे महावितरणने योग्य ते पाऊल उचलून वीज बिल वसुली करावी जेणेकरून विज बिल वसली व आर्थिक नुकसान यामध्ये समतोल राखण्यात येईल.
नवे वीजदर मागे घेण्याची मागणी
महावितरण आपली तूट भरून काढण्यासाठी सामान्य ग्राहकांवर भुर्दंड पाडल्याने ग्राहकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी विजेचे वेगवेगळे दर असताना तूट भरून काढणे हे कारण पुढे करून महावितरण सामान्य ग्राहकांवर अन्याय करीत • आहे. एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आलेली नवीन वीज बिल वाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे
काँग्रेस छेडणार आंदोलन
महावितरणने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यापासून वीज बिलात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वीज बिल धोरणाने ग्राहकांना मनस्ताप होणार आहे. वीज बिलातील वाढ ग्राहकांवर अन्याय करणारी असून या विरोधात कॉंग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल.
-गुरू गुरुनुले अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, मुल.






