Home आपला जिल्हा Breaking News प्रभू श्रीरामांच्या आदर्शांना नमन… शोभायात्रेत प्रचंड गर्दी@ मुल शहर घोषणांनी दुमदुमले

प्रभू श्रीरामांच्या आदर्शांना नमन… शोभायात्रेत प्रचंड गर्दी@ मुल शहर घोषणांनी दुमदुमले

180

प्रभू श्रीरामांच्या आदर्शांना नमन…शोभायात्रेत प्रचंड गर्दी; शहर घोषणांनी दुमदुमले, श्रीराम मंदिरांवर आकर्षक रोषणाईप्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्य मुल शहरात भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्सवात सर्वत्र श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.
       शहरात विविध संघटनांच्या वतीनेशोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. गुरुवारी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजाअर्चा करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

दरारा मंडळतर्फे राम नवमीनिमित्त भव्य शोभयात्रा काठण्यात आली होती. दरार मंडळचे अध्यक्ष प्रशांत समर्थ तसेच त्यांचे सहकारी यांनी दरार चौकात शरबत वाटपाचा कार्येकम केला. शरबत पिण्यासाठी भावकांनी चांगलीच गर्दी केली होती. हजारो भाविकांनी शरबताचा लाभ घेतला.

मुल शहराच्या विविध भागातून श्रीराम नवमीनिमित्य निघालेल्या शोभायात्रेने शहर भगवेमय झाले होते. श्रीरामभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र येथील मुल शहरातील गांधी चौकात दिसून आले. शोभायात्रेतील देखाव्यांनी डोळ्याचे पारणे फेडले.