Home आपला जिल्हा Breaking News आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र @कागदपत्रे काय काय लागतात ?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र @कागदपत्रे काय काय लागतात ?

470

कृषी उत्पन्न बाजार समिती साठी जोडावयाचा कागदपत्र मा.तहसिलदार यांनी दिलेला आर्थीक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरूअसून, याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र सुरूवात झाली आहे.
              कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असणा°या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र  सुरूवात झाली आहे. सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटूंबांना आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घ काळापासून होत होती. त्याचा विचार करून केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी अल्पावधीत सुरू झाली असून ‘महा- आॅनलाईन’मार्फत चालविल्या जाणारे महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेचे प्रमाणपत्र तयार करून देण्यास  प्रारंभ करण्यात आला. 
हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित घटकातील लाभार्थ्यांकडून स्वयंघोषणापत्र, १३ आक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीपासून महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला, आधारकार्डची प्रत, बोनाफाईड, निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा अधिक नसल्याचा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे मागविण्यात येत आहेत.
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शासनाकडून १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर ‘महा- आॅनलाईन’मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेचे प्रमाणपत्र तयार करून देण्यास  सुरूवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून हे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. 

 आवश्यक कागदपत्रे

अर्ज
आयकर भरण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म किंवा ज्या ठिकाणी काम करतो, तेथील मालकाने दिलेले गत आर्थिक वर्षातील एकूण वेतन प्रमाणपत्र / बॅंकेच्या पासबुकाची प्रत / चालु सातबाराचा उतारा / तलाठयाने जारी केलेले आयकर प्रमाणपत्र/ तलाठी / सर्कल ऑफीसरने जारी केलेला पडताळणी अहवाल / वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र
इतर
छायाचित्र ओळखपत्र/ पॅनकार्ड/ निवडणूक ओळखपत्र/ वाहन परवाना/ पारपत्र/ फोटो असलेले बँक पासबुक/ झोपडपट्टी फोटोपास/ ज्येष्ठ नागरिक दाखला/ नोकरीचे ओळकपत्र (पैकी कोणतेही एक)
तलाठी अहवाल
दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र
नगरसेवक उत्पन्न प्रमाणपत्र
भुमिहीन प्रमाणपत्र
मृत्यु प्रमाणपत्र
रेशन दुकानदाराचा दाखला
रेशनकार्ड रद्द दाखला
शिक्षणासाठी असेल तर विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पुरावे
स्वघोषणं पत्र
स्वप्नपूर्ती योजना
प्रतिज्ञालेख
शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
वीज बील / मालमत्ता कराची पावती / तलाठ्याने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र
मागील तीन वर्षांचे मिळकतीचे प्रमाणपत्र
राजपत्रामध्ये जाहीर केलेला नावातील बदलाबाबतचा पुरावा
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र तलाठ्याने जारी केलेले रहिवास प्रमाणपत्र तलाठ्याने जारी केलेला उत्पन्नाचा दाखला वेतन प्रमाणपत्र आधार कार्ड ग्रामपंचायत/सरपंचाने जारी केलेला रहिवास दाखला पोलीस पाटलाने जारी केलेला रहिवास दाखला मंडलाधिकारी चौकशी अहवाल मंडळ अधिकारी अहवाल *यासंदर्भातील अधिनियम/नियम यामध्ये काही शुल्क विहित केले असल्यास ते देय राहील.

1 2 3