50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का?

134

नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे. आता याच अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची (Agriculture) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुमचं नाव या यादीत आहे का नाही.

प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची (Subsidy) दुसरी यादी ऑनलाईन प्रकाशित करण्यात आली आहे.  csc पोर्टलवर प्रकाशित होत आहे.

 

ही’ प्रक्रिया आवश्यक
शेतकऱ्यांना 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी kyc प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. आता या दुसऱ्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर तात्काळ kyc प्रक्रिया करून घ्यावी. तरचं शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते.

कशी पाहाल ऑनलाईन लाभार्थी यादी?
csc च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील ज्या शेतकऱ्यांचे csc पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल. यासाठी तुम्हाला csc पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल. त्यावर तुम्हाला लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल. त्यांनतर A पासून Z पर्यंत तालुक्यांची नावे दिली जातील. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील. तुम्ही ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकता. यानंतर तुम्हाला केवायसी साठी सूचना करण्यात येतील. जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा.