मुल नगरपालिकेत मुख्याधिकारी अजय पाटणकर साहेब रूजू

71

श्री. अजय पाटणकर देवरी नगर पंचायत देवरी जि. भंडारा येथून मुल  नगरपरीषद येथे बदली झालेली आहे.मुल येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची प्रतिक्षा अखेर संपली असून सोमवारला नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून  पाठनकर साहेब यांनी पदभार स्विकारला.
नवीन मुख्याधिका-याकडून मुल शहरातील नागरीकांना मोठया अपेक्षा आहेत. सुमारे काही महिन्यांचा कालावधी कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने मुल शहरातील अनेक विकास कामे,खोळंबलेली आहे ही कामे मार्गी लागावी,अशी अपेक्षा आहे.

नव्याने रुजू झालेले मूल नगरपरिषद चे मुख्याधिकारी मान. श्री. पाठनकर साहेब यांच्या हस्ते आज दि. 5/9/22 मानाच्या आरतीला उपस्थिती लाभली राजे युवा गणेश मंडळ,मूल तर्फे यांचे मूल नगरीत हार्दिक स्वागत करण्यात आले. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.💐💐