मुल येथे टूव्हिलर रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती

24
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने  मुल  तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय मुल  यांच्या संयुक्त विद्यमाने फोरव्हिलर,टूव्हिलर  रैलीद्वारे तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले.
मुल  येथील तहसील कार्यालय येथून गांधी चौक ते नगरपरिषद ,नागपूर रोड,विश्रामगृह रोड,चंद्रपूर रोड येथे तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी , यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रैलीला रवाना करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी,  उपस्थित होते.सदर रॅली ही तहसील कार्यालय येथून गांधी चौक ते नगरपरिषद ,नागपूर रोड,विश्रामगृह रोड,चंद्रपूर रोड या मार्गावरुन गेल्यानंतर  तहसिल कार्यालय मुल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी झेंडा लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या रैलीमध्ये नायब तहसिलदार साधनकर साहेब,पवार साहेब,कुंभारे साहेब,ठाकरे साहेब,उपनिरीक्षक पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी,महसूल विभागातील तलाठी,बेलसुरे साहेब,दिनेश पुजारीजी,कारकुन संबधीत विभागातील कर्मचारीनिवडणूक विभागातील अमोल करपेजी,मंडळ अधिकारी,विविध विभागातील महिला कर्मचारी,रेशन विभागातील कर्मचारी,रेशनविक्रेता,सेतू केंद्रातील कर्मचारी,आधार केंन्द्रातील कर्मचारी,, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,  नागरिक हातात तिरंगा घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.