‘महाडीबीटी’ शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

48

‘महाडीबीटी’ शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २०२1-२2 च्या शैक्षणिक वर्षासाठी आता १५ FEB पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st January 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st January 2022.

Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced.

Last date for Renewal Application Acceptance is 15th February 2022 and for New Application Acceptance is 15th February 2022.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ओबीसी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक अशा विविध प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक शुल्कात सवलत; तसेच वसतिगृहाच्या शुल्कासाठी भत्ता, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या चौदा शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तींना हजारो विद्यार्थी दर वर्षी अर्ज करतात. २०२1-२2 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 15 FEB पर्यंत मुदत देण्यात आली 

 

२०20-२1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी आधीच्या अर्जांमधील सर्व त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…

१. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.

२. पोर्टलवर लॉग इन व्हा.

३. तुमचे प्रोफाइल तयार करा.

४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

पुन्हा अर्ज करणाऱ्यांसाठी…

१. लॉग इन करा.

२. त्रुटी असलेला अर्ज दिसेल.

३. त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा एकदा ‘सबमिट’

शिष्यवृत्ती/ सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड असणे गरजेचे आहे. तरी काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास व्यत्यय येत आहे. असे विद्यार्थी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ आधार सीड असलेले खाते उघडण्याचा लाभ घेऊ शकतात. खाते उघडण्यासाठी पुढील बाबींची आवशकता आहे.-

  1. 1 मोबाईल क्रमांक
  2. 2 आधार क्रमांक
  3. 3 पॅनकार्ड (उपलब्ध असेल तर)
  4. 4 शिष्यवृत्ती अँप्लिकेशन क्रमांक.

‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ खाते साधारण बचत खाते असल्याने ते उघडणायची सुविधा इतर विद्यार्थी तथा नागरिकांना पण उपलबध आहे. हे खाते तात्काळ उघडले जाते आणि त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज भासत नाही. तरी सर्वानी ह्या संधीचा फायदा घ्यावा.