प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा

30

प्रजासत्ताक दिना उत्साहत साजरा

मूल:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा   73 वा वर्धापन दिन तालुक्यातील विविध शाळा,महाविद्यालय,शासकीय कार्यालय,संस्थामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या नियमाचे पालन करून  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने विविध रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात विद्याथ्र्यांनी मोठया संख्येने सहभाग घेऊन उपस्थिताची मने जिंकली.

तहसील कार्यालय मूल

 भारतीय प्रजासत्ताक दिनानिर्मित्य तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.15 वाजता उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर साहेब,तहसिलदार डाॅ.रविन्द्र होळीसाहेब ,नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर

साहेब,पवार साहेब,

ठाकरे साहेब,महसूल विभाागातील कर्मचारी वृंद,पुरवठा विभागातील,निवडणूकी विभागातील,संजय गांधीनिराधार,श्रावणबाळ योजनेतील अधिकारी,कर्मचारी , नगरपरीषद मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम तसेच कर्मचारीपोलीस विभागातील पोलीस निरीक्षक राजपूत साहेब,पोलीस कर्मचारी,व मूल येथील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. कलानिकेतन चा वादय संच तसेच नवभारत कन्या विदयालय च्या विद्याथ्र्यांनी देशभक्ती गीत सादर केला.

 

पंचायत समिती, मूल येथे गणराज्य दिन साजरा

आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती मूल येथे 72 वे गणराज्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आले असून ध्वजारोहण मा. चंदूभाऊ मारगोनवर, सभापती, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रम दरम्यान कोविड योद्धा म्हणून
श्री. विनोदकुमार वैद्य, वि.अ. आरोग्य, श्री. चंद्रकांत जक्कुलवार, वि.अ. आरोग्य यांना मा. श्री. चंदूभाऊ मारगोनवर, सभापती, मा. श्री. कारडवार, गट विकास अधिकारी, पं. स. मूल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


सदर कार्यक्रमाला सौ. जयश्रीताई वलकेवार, उप सभापती, सौ. पुजाताई डोहणे, पं. स. सदस्य, सौ. वर्षाताई लोनबले,पं. स. सदस्य, श्री. प्रकाश तुरानकर तालुका अभियान व्यवस्थापक, कु. जयश्री कामडी ,

तालुका समन्वयक, श्री. स्नेहल मडावी तालुका समन्वयक, श्री. वसीम काझी प्रशासन व लेखा सहाय्यक, श्री. अमर रंगारी प्रभाग समन्वयक,श्री. रुपेश आदे प्रभाग समन्वयक, श्री. सचिन येरमलवार, हर्ष गजभिये आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

नगर परिषद मुल :

७३ व्या गणतंत्र दिनाचा सोहळा मुल नगर परिषद कार्यालयाच्या श्रीमती. शोभा हरी सांडे महिला सफाईमित्र ह्याच्या हस्ते ध्वजरोहान पार पाडण्यात आला,या मागचा हेतू सफाईमित्राला सन्मान होता. सदर सोहळ्यास मा. श्री.महादेव खेडेकर प्रशासक अधिकारी तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सिद्धार्थ मेश्राम आणि समस्त अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.