स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना पंचायत समिती मार्फत अर्ज करण्याचे आवाहन

32

चंद्रपूर:–

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सर्वांचे उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा आहे. त्या योजना खालीलप्रमाणे.

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठीपीठ गिरणी,शिवणयंत्र,झेराॅक्स मशीन,संगणक वपिं्रटर आदीसाठी अर्थसाहाय्य तसेच दिव्यंागशेतक-यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन,कुक्ुटपालन, मत्सपालन,दुग्धव्यवसाय आदीव्यवसायांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणविभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.दिव्यांग शेतक-यांना उत्पन्नाच्या दाखल्याची
अट न लावता,शेतीविषयक अवजारे,मोटर पंप,विहीर खोदणे,गाळ काढणे,पाईप लाईन,मळणीयंत्र ठिबक सिंचन,तसेच बी-बीयाण्यांसाठीअर्थसहाय्य देण्यात येते.तरी इच्छूक दिव्यंाग लाभाथ्र्यांनी पंचायत समिती
मार्फत अर्ज सादर करावे,असे आवाहन जिल्हासमाजकल्याण अधिकारी सूरेश पेंदाम यांनी केले आहे.