Home आपला जिल्हा राकेश रत्नावार यांची निवड संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी

राकेश रत्नावार यांची निवड संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी

127

मूल : संजय मारकवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मूल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अशासकिय अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राकेश रत्नावार यांची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिफारसीनंतर ऑक्टोबर २०२० मध्ये मूल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी संजय मारकवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान संजय मारकवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्षपद रिक्त होते. रिक्त असलेल्या पदावर अलीकडेच राकेश रत्नावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक असलेले राकेश रत्नावार हे कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असून नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. रत्नावार यांच्या नियुक्तीचे जिल्हा मध्यवर्ती सकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.