Home आपला जिल्हा Breaking News पंचायत समिती,मुल परिसरातील अतिक्रमित दुकाने हटले….

पंचायत समिती,मुल परिसरातील अतिक्रमित दुकाने हटले….

631

पंचायत समिती,मूलच्या आवारात सध्या इराई बचत गट शॉंपिग मॉलचे बांधकाम झाल्यामूळे सदर मॉलचा
दर्शनी भाग मूख्य रत्याकडे असल्याने तसेच पंचायत समितीच्या मालकीची असलेली संरक्षक भिंत पाडण्याची कार्यवाही
करण्यात आल्याने गुरूदेव मोहूर्ले,वाकडे झेरॉक्स,प्रमोद मशाखेत्री,रायपूरे यंाचे मालकीचे अतिक्रमित दुकान या संरक्षक भिंतीला लागून असल्याने दुकाने आज 03जून काढण्यात आलेले आहे…मूल पंचायत समिती कार्यालय परिसरात जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या ‘हिराई शॉपिंग मॉल’ समोरील अतिक्रमणाचा प्रश्न अखेर मार्गी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या वतीने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, पाच दिवसांच्या आत जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते आर्थिक महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून या मॉलचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, समोरील जागेवरील अनधिकृत अतिक्रमणामुळे पुढील विकासकामे रखडली होती. प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मुदतीत अतिक्रमण हटविल्याने बचत गटांच्या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

दुकाने हटवल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

    • स्थानिक मूल नगरपालीका क्षेत्रातील  फेरीवाला कायद्यांतर्गत (Street Vendors Act) अधिकृत परवाना होता.

    • स्थानिक आमदार किंवा लोकप्रतिनिधींमार्फत कधीही बेरोजगार फुटपाथच्या दुकानदाराच्या समस्या समजून घेतल्या गेल्या नाही.

    • शासकीय योजनांचा लाभ: तात्काळ आर्थिक आधार मिळण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM SVANidhi) अंतर्गत फेरीवाल्यांना मिळणारे कर्ज PM SVANidhi कर्ज विविध बॅंकेतील दुकानदारांनी उचलेले आहे ते फेडयाचे कसे असे प्रश्न पडलेले आहेत.