Home आपला जिल्हा Breaking News नागभीड-बल्लारशाह रेल्वेमार्गावरील सिंदेवाही- राजोलीदरम्यान घटना@रेल्वेच्या धडकेत २ वर्षीय वाघीण ठार

नागभीड-बल्लारशाह रेल्वेमार्गावरील सिंदेवाही- राजोलीदरम्यान घटना@रेल्वेच्या धडकेत २ वर्षीय वाघीण ठार

26

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली ते सिंदेवाही मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडली असा अंदाज आहे, २८ मे रोजी पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास राजोली ते सिंदेवाही या रेल्वेमार्गावर रेल्वे पिल्लर क्रमांक ११८१/८ ते ११८१/९ दरम्यान रेल्वे इंजिन क्रमांक L/E ४१८२० च्या धडकेत मादी वाघाचा मृत्यू झाला. मृत वाघिणीचे वय अंदाजे २ ते ३ वर्षे असून सदर वाघिणीचे अवयव पूर्णतः शाबूत होते.याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त होताच मुख्य वनसंरक्षक मणिकंद रामानुजन, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक गायकवाड, NTCA चे प्रतिनिधी बंडू धोत्रे व Swab Nature Care चे यश कायरकर यांच्या उपस्थितीमध्ये मृत वाघिणीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.