नागरिकांना मिळणार विविध योजनांचा लाभ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मूल तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना महसूल सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.
तहसील कार्यालय मूल येथे 08 मे २०२६ रोजी सकाळी 10 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे. अभियानांतर्गत मूल तालुक्यातील मूल महसूल मंडळ नागरिकांसाठी विविध महसूल सेवा व तक्रार निवारणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये एक खिडकी योजना (विविध नमुने ७/१२ आणि ८ अ), मालमत्ता कर नोंदणी निपटारा, अभिलेख दुरुस्ती, विविध दाखले वाटप तसेच अकृषक अभिमूल्य भरणा अशा सेवा दिल्या जाणार आहेत. याशिवाय, या अभियानात नागरिकांना महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित कामांसाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार चिडे यांनी केले आहे.
शिबिरात मिळणाऱ्या सेवा:
✅ 7/12 मधील चुका दुरुस्ती
✅ प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली
✅ उत्पन्न दाखला
✅ अधिवास (Domicile) दाखला
✅ जातीचा दाखला
✅ महसूल विषयक मार्गदर्शन
या शिबीरामध्ये खालीलप्रमाणे महसूल विभाग व इतर शासकीय विभागांच्या सेवांचा लाभ दिला जाणार आहे
१.प्रलंबित फेरफार निकाली काढणे
२. जिवंत ७/१२ मोहीम
२. शालेय दाखले वाटप
३. विशेष अर्थसहाय योजना लाभ
४. पी एम किसान योजना
५. अग्रिस्टॅक योजना
६. ७/१२ अद्ययावतीकरण
७. नवीन अकृषक धोरण माहिती देणे
८. भोगवटा २ जमिनी नियमानुसार वर्ग १ बाबत कार्यवाही
९. तुकडेबंदी धोरण बाबत कार्यवाही करणे
आदी कामे केली जाणार आहेत
तरी याचा सर्व नागरिक, शेतकरी , विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल चे तहसीलदार चिडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
💡 विशेष: नागरिकांना एकाच दिवशी सेवा देण्यासाठी Single Day Service सुविधा उपलब्ध असेल.
👉 सर्व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.








