Home आपला जिल्हा Breaking News संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयातीचा...

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करणे अनिवार्य

89

महाराष्ट्र शासनाने आता हयातीचा दाखला जमा करण्यासाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’ (Face Authentication) तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना घरबसल्या मोबाईलवरून फोटो काढून हयातीचा दाखला देता येतो.

जीवन प्रमाणपत्र दरवर्षी ठराविक मुदतीत (सहसा जूनच्या अखेरीस) सादर करणे आवश्यक असते.

फायदे: वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन बंद होऊ शकते, म्हणून हयातीचा दाखला अद्ययावत करणे गरजेचे आहे.

कुठे संपर्क करावा: जर ऑनलाइन सुविधा वापरता येत नसेल, तर जवळच्या सेतू केंद्रात मूल शहरातील प्रगती आपले सरकार सेवा केंन्द्र रामलीला भवनच्या बाजूला सौ.वैशाली प्रमोद मशाखेत्री प्रगती कॉम्यूटर सेतू केंन्द्र मूल

टीप: पेन्शन सुरू ठेवण्यासाठी जून 2026 च्या अंतिम मुदतीपर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असू शकते

पेन्शनचा लाभ सुरु ठेवण्यासाठी हयातीचा दाखला आवश्यक, कसा मिळवायचा हा दाखला ?
Pension Scheme : म्हातारपणात आधार म्हणून पेन्शनकडे कडे पाहिले जाते. पण अलीकडे सगळी व्यवस्था ऑनलाईन झाल्याने अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासते. म्हणूनच जे पेन्शनधारक आहेत, अशा नागरिकांना हयातीचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे.
हयातीचा दाखला सादर करण्याआधी पेन्शनधारक जीवंत आहे, हे ठरवावं लागतं. म्हणजेच पेन्शनधारक हात असून त्याला मिळणारा लाभ यापुढेही सुरु राहावा, यासाठी हयातीचा दाखला मिळवणं गरजेचं असतं. आता हा दाखला नेमका कसा मिळवायचा, हे आपण पाहणार आहोत….
नवीन नोंदणीसाठी काय कराल?
ॲप डाउनलोड करा : सर्वप्रथम केंद्र सरकारचे Jeevan Pramaan हे ॲप डाउनलोड करा. नोंदणी करा : त्यानंतर या अॅपमध्ये जाऊन ‘Register as new user’ वर क्लिक करा.
माहिती भरा : तुमचा आधार क्रमांक, नाव, बँक खाते क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि इतर आवश्यक माहिती भरा.
OTP मिळवा: ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP
भरा.
प्रमाण आयडी मिळवा : माहितीची पडताळणी झाल्यानंतर सबमिट करा. तुम्हाला एक ‘प्रमाण आयडी’ जनरेट होईल.
हयातीचा दाखला (Digital Life Certificate) तयार करा.
• लॉगिन करा : जनरेट झालेल्या प्रमाण आयडी आणि दुसऱ्या OTP च्या मदतीने ॲपमध्ये पुन्हा लॉगिन
करा.
• जीवन प्रमाण पर्याय निवडा : या ठिकाणी ‘Generate Jeevan Pramaan’ पर्यायावर क्लिक करा.
·
माहिती भरा : पुन्हा आधार क्रमांक, मोबाइल नंबर आणि PPO क्रमांक अशी माहिती भरा.
बायोमेट्रिक पडताळणी करा : म्हणजेच तुमचा आधार डेटा वापरून तुमचा फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे) आणि आयरिस स्कॅनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करा.
• प्रमाणपत्र मिळवा : हि सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुमचा हयातीचा दाखला (Digital Life Certificate) तयार होईल आणि तुम्हाला SMS द्वारे कन्फर्म चा मॅसेज येईल.