Home आपला जिल्हा Breaking News राजगड महसूल मंडळ येथे ‘महाराजस्व अभियान समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना...

राजगड महसूल मंडळ येथे ‘महाराजस्व अभियान समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना दाखल्यांचे वाटप

239

मूल – महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत राजगड मंडल स्तरावरील ‘समाधान शिबिर’ शनिवार, दि. 10ए​प्रिल २०२६ रोजी स्व बाबुजी पाटील हायस्कूल राजगड येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाने आपली सेवा थेट जनतेच्या दारात आणली असून, एकाच छताखाली शेकडो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मूल तहसिलचे तहसीलदार मृदुला मोरे,भूमिअभिलेख अधिकारी,नायब तहसिलदार तसेच पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच,माजी उपसरंपच सदरस्य महसूल मंडळ साजातील ग्रामपंचायत सदस्य तसेच , आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने या शिबिरासाठी जय्यत तयारी केली होती, ज्याचा फायदा राजगड मंडळातील गावांना झाला. विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले,डिजिटल ७/१२ आणि २५९ ‘८अ’ उताऱ्यांचे वितरण झाले, फेरफार निकाली काढले असून, सातबारा दुरुस्तीचे अर्ज स्वीकारण्यात आले, अर्जांवर जागीच कार्यवाही करण्यात आली. तसेच शिबिरात भूसंपादन व अकृषक (NA) परवानगीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून गाव दप्तर अद्यावत करण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी राजगडचे मंडल अधिकारी , निवासी नायब तहसीलदार पवार , नायब तहसिलदार पंडीले,संजय गांधी निराधार नायब तहसिलदार चिडे,पुरवठा विभागाच्या शिरभाते, आणि विविध गावांतील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी (तलाठी) विशेष परिश्रम घेतले.तसेच सेतू केंन्द्र व आधार केंन्द्र आॅपरेटर,आरोग्य विभागातील कर्मचारी तसेचराजगड महसूल साजातील विविध गावातील पोलीस पाटील उपस्थित होते , विविध विभागातील कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी,नागरीक,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.