Home आपला जिल्हा Breaking News मूलमध्ये लोकांना वस्तू मिळण्याची प्रतीक्षा @जुन्या गुन्ह्यात दुकानदाराला अटक

मूलमध्ये लोकांना वस्तू मिळण्याची प्रतीक्षा @जुन्या गुन्ह्यात दुकानदाराला अटक

1033

अटकेमुळे भांडे फुटले; स्वस्त वस्तूंच्या आमिषाने नागरिकांना लाखोंचा गंडा ?
मूल : बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत चैनीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी जुन्या गुन्ह्यात मंगळवारी (दि. ७) एका दुकानदाराला अटक करून घेऊन गेले. राज नारायण (६५) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे.
अवघ्या आठ दिवसांपूर्वी शहरात एक आकर्षक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये एअर कंडिशनर, फ्रीज आणि विविध घरगुती भांडी अत्यंत स्वस्त दरात देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
या आकर्षक योजनेला भुलून शहरातील अनेक नागरिकांनी, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांनी बुकिंगसाठी रांगा लावल्या.  उराडे यांच्या घरात आरोपी राज नारायण याने हे तात्पुरते दुकान थाटले होते.नागरिक ठाण्यात धडकलेलोकांना वस्तू मिळण्याची प्रतीक्षा असतानाच, मध्य प्रदेशातील इंदूर येथील पोलिस पथकाने मूल येथे धडक दिली. राज नारायण याला जुन्या एका गुन्ह्याप्रकरणी अटक करून घेऊन गेले. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि ज्यांनी पैसे भरले होते, त्या नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. मात्र, दुकानाचे शटर बंद असल्याचे पाहून नागरिक पोलिस ठाण्यात धडकले………….