दिनांक 05 फेब्रवारी गुरूवार ला 12 वाजता ग्रामपंचायत येथे आधार शिबीर चालू होणार तरी नागरीकांनी विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा..
तरी नागरीकांनी येतांना ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा रेशनकार्ड,जुना आधार कार्ड, मोबाईल नंबर घेवून यावे..‘आधार’ला दहा वर्षे झाली, अपडेट केले का? ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून १० वर्षे पूर्ण झालीत त्यांना आधार अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजना सुरु झाली तेव्हा कोणतीही कागदपत्रे ज्यांनी दिले नाहीत त्यांना आता ‘आधार’मध्ये असलेले नाव, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाइल क्रमांक, ई- मेल, रहिवासी पत्ता आदी अपडेट करावे लागेल. तसेच डोळ्यांची बुबुळे, बोटांचे ठसे, चेहऱ्याचे सुधारित छायाचित्र द्यावे लागणार आहे.
१० वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक
आधार कार्ड काढल्यानंतर दर पाच ते दहा वर्षांनी अपडेट करावे लागते. विशेषतः घराचा पत्ता बदललेला असेल
तर किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर त्यांना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे, चेहऱ्याचे छायाचित्र बदललेला मोबाइल क्रमांक आदींमध्ये बदल होतो.
आधार अपडेट कोठे करावे?
जिल्ह्यातील प्रत्येक आधार केंद्रामध्ये आधार कार्ड अपडेट केले जाते. लहान मुलांचे कार्ड अपडेट मोफत केले जाते. बँक, पोस्ट कार्यालय तसेच इतर विविध ठिकाणीही आधार
केंद्रातून आधार आधार कार्ड अपडेट करता येते.
कागदपत्रे काय
आवश्यक?
जन्म प्रमाणपत्र, मार्क
शीट्स, ओळखीचा पुरावा, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट भाटी
पहिल्यांदाच आधार
काढताय?
पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर संबंधित केंद्राकडे आवश्यक कागदपत्रे
लागतात. मुलाचे आधार कार्ड
काढायचे असेल तर वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
बोटांचे ठसे, पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे दर काही वर्षांनी आधार अपडेट करणे गरजेचे आहे. विशेषतः घराचा पत्ता बदलतो, मात्र आधार कार्डवर जुनाच ठेवला जातो किंवा बोटांचे ठसे, चेहऱ्यातील बदल यामुळे अद्ययावतीकरण करणे गरजेचे
आहे.
मुलाचे आधार अपडेट कसे कराल?
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे आणि तसे करण्याची प्रक्रिया निःशुल्क आहे.
यूआयडीच्या नव्या नियमानुसार आधार अपडेट करणे बंधनकारक आहे. प्रत्येकाने पाच ते दहा वर्षांनी ते अपडेट करावे. विशेषतः मोबाइल नंबर, घरचा पत्ता, चेहऱ्यातील बदल, बोटांचे ठसे यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे.
आधार शिबीरांचे आयोजन करण्यात आलेला आहे तरी नागरीकांचा संधीचा लाभ घ्यावा…
ग्रामपंचायत ग्रामपंचायत 5 फेब्रवरी गुरूवारला 12 वाजता तह मूल जिल्हा चंद्रपूर
वरील तारखेला आधार शिबीरांचे आयोजन करण्यात आलेला आहे तरी नागरीकांनी संधीचा लाभ घ्यावा…
आधार बायोमेटिक अपडेट करणे अनिवार्य
फेब्रवारी महिण्यात विशेष शिबीर : नागरीकांच्या,विद्याथ्याच्या सोयीसाठी उपाययोजना
5 ते 15 वर्ष वयोगटातील मुला—मुलींचे आधार बायोमेटिक अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी फेब्रवारी महिण्यात मूल तालुक्यात विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मोठया प्रमाणावर मुलांनी आपले कोर बायोमेटिक दिलेले नाहीत. त्यामूळे त्यांचे एमबीयू—1 प्रलंबित आहे. तसेच 15 वर्षानंतर अनेक विद्याथ्र्यांनी बायोमेटिक अद्ययावत केलेले नाहीत म्हणून त्यांचे एबीयू—2 प्रलंबीत आहे.जेव्हा बायोमेटिक प्रमाणिकरणाची आश्वकता भासते उदा जेईइ किंवा नीटसारख्या स्पधा् परीक्षामध्ये बसताना तेव्हा एकदम मोठया प्रमाणावर अद्ययावत करण्यासाठी गर्दी होते. वेळेत बोयोमेटिक अद्यावत न झाल्यामूळे अनेक विद्याथ्र्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.
त्या करीता एमबीयू—1 एमबीयू 2 वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.पाच वर्षाखालील मुलांचे आधार नोंदणी करताना केवळ चेह—याचा फोटो आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती घेतली जाते.या वयाच्या टप्यावर बोटांचे ठसे व डोळयाच्या बुबुळाचे बायोमेटिक घेतले जात नाहीत.आधार नोंदणी व अद्ययावत नियमानूसार पाचव्या वर्षी व पंधराव्या वर्षी मुलगा मुलगी पाच वर्षाचा झाल्यावर प्रथमच बोटांचे
ठसे व डोळयाचा बुबुळाचे बायोमॅटिक तसेच अद्ययावत चेह—याचा फोटो द्यावा लागतो.
विविध योजनांचा लाभ,शिष्यवृष्ती शाळा,महाविद्यालयातील प्रवेश,बॅंक व्यवहार,यासह
इतर महत्वाच्या सेवासाठी आधारची अद्ययावत माहिती आवश्यक आहे.
त्यामूळे नागरिकांनी आपल्या मुलांचा आधार बायोमेटिक वेळेत अपडेट
करणे अत्यंत गरजेचे आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखखाली
प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अपडेट न झाल्यास विविध शासकीय योजनांचा
लाभ घेण्यास अडचण होउू शकते.






