Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे भगवान विश्वकर्मा जयंती

मूल येथे भगवान विश्वकर्मा जयंती

79

विश्वब्राम्हण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन

मूल : स्थानिक पांचाळ समाजबांधवानी मूल नगराच्या मुख्य मार्गाने एक रंगणतील वस्त्र प्रदान करून डोक्यावर घट घेऊन, नटून थटून तर पुरुषांनी श्वेत वस्त्र प्रदान करून, मिरवणूक गांधी चौक मूल येथून मुख्य मार्गाने दुर्गा मंदिर जवळली रस्त्याने भगवान विश्वकर्मा मंदिरात पोहचली, या मिरवणुकीत शेकडो समाजबांधव उपस्थित झाले होते. याचे मुख्य आकर्षण म्हणजे मिरवणुकी समोर दिंडी ढोलक टाळ, मंजिराच्या गजरात ही दिंडी नागरातील लोकांना आकर्षित करीत होती. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
मंदिरात या मिर्वणुकीचे यांचे रूपांतर समजप्रबोधनात झाले. सदर कार्यक्रमाचे उदघाट्न डॉ. अविनाश चेल्लेलवार  एम् गोल्ड मेडलिस्ट यांचे हस्ते, डॉ. अनिल अदलवार मधुमेह तज्ञ, प्रा. सुधीर तलाशकेवार, इंग्रजी तज्ञ, राजेंद्र येलचलवार ज्योतिष तज्ञ, डॉ. चक्रपाणी चोप्पावार, अभ्यासक, यांचे प्रमुख उपस्थितीत तर समाजातील जेष्ठ निवृत्त मुख्याध्यापक वसंत जिरकुंठवार अध्यक्षतेखाली पार पडले. समाजातील दिशा आणि दशा यावर उपस्थित पाऊण्यांनी प्रकाश टाकला तर संगणक युगात मुलांची अभ्यास करण्याची प्रवृत्ती निकामी होत चालली याकरिता येणाऱ्या पिढीने स्वतःचा बौद्धिक विकास कसा करावा याचा एका प्रात्यक्षिकाद्वारे डोळ्याला पट्टी बांधून आपल्या बौद्धिक क्षमतेने समोरच्या व्यक्ती कोण आहे. काय करतात हे डॉ. अविनाश चेल्लेलवार जादुई गणित, जागतिक पुरस्कार प्राप्त यांनी करून दाखविले. आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विक्की
बोन्दगूलवार, नंदा तासलवार यांनी तर उपस्थितांचे आभार राजूरवार यांनी मानले. कार्यक्रमकरिता
संस्थेचे कार्याध्यक्ष संजय येरोजवार, सचिव विजय वैरागडवार, वृषाली
बद्दलवार, नंदा तासलवार, दिलीप कटलावार, भास्कर कनौजवार, विनायक कनौजवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.