Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरात उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा@ सांस्कृतिक कार्यक्रमात वसतिगृह मुल ने प्रथम...

मूल शहरात उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा@ सांस्कृतिक कार्यक्रमात वसतिगृह मुल ने प्रथम क्रमांक

76

मूल शहरात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय कार्यक्रम मूल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पंचाय​त समिती मूल कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी शिंदे यांनी ध्वजरोहण करण्यात आले

नगर परिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.एकता समर्थ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी , नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका तसेच विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी मूल तहसील कार्यालय मूल येथील उपविभागीय अधिकारी,अजय चरडे,तहसिलदार चिडे,नायब तहसिलदार पवार,नायब तहसिदार पंडीले पुरवठा विभागातील शिरभाते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस विभागातर्फे मानवंदना देण्यात आली.

मूल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शहरातील विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांमध्येही ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संपूर्ण शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

तहसील कार्यालय मुल तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी मुला – मुलींचे वसतिगृह मुल ने प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन.