Home आपला जिल्हा Breaking News मूल तहसील मध्ये 16 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा

मूल तहसील मध्ये 16 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा

54

मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वपुर्ण .अजय चरडे उपविभागीय अधिकारी

मूल तहसील मध्ये 16 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा

भारतीय स्वातंत्र्यापासूनच आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपल्या लोकशाहीची मूल्ये बालपणापासूनच आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे. 17 व्या वर्षी आपण मतदार नोंदणी करू शकतो व 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानासाठी पात्र ठरतो. कारण मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीचे पहिले मुल्य आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अजय चरडे Mr. Ajay Charad Sub-Division Officer यांनी केले.

25 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी आल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाच्या मूल च्या वतीने तहसील मूल येथे आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी तहसीलदार चिडे, नायब तहसिलदार पंडीले,नायब तहसिलदार पवार, तालुका पुरवठा अधिकारी , आदी उपस्थित होते.

संपूर्ण भारतात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे. निवडणुकांमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा असल्यामुळे मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतात प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिला आहे. मतदान न करणे अतिशय दुर्देवी असून मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येते.

निवडणुका ह्या लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. मुक्त आणि नि:पक्ष वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे. संविधान सभेत ‘मतदानाचा सार्वत्रिक अधिकार’ या कलमावर सर्वांचेच एकमत झाले होते. त्यामुळे देशाच्या उज्वल भविष्यासाठी मतदार नोंदणी करा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार चिडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने केंद्रस्तरीय, ब्लॉकस्तरीय निवडणूक अधिकारी, महसूल कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.

मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वपुर्ण

25 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे. ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल त्यांनी त्वरीत मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी आता ऑनलाईनसुध्दा करता येते. मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वाचा अधिकार आहे, असे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी सांगितले.