Home आपला जिल्हा Breaking News एमपीएड,एमएड सीईटी नोंदणीला मुदतवाढ

एमपीएड,एमएड सीईटी नोंदणीला मुदतवाढ

50

एमपीएड सीईटी नोंदणीला मुदतवाढ
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेतल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) आणि मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणीची मुदत २० जानेवारीपर्यंत होते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
एमपीएडसाठी १०३८, तर एमएडसाठी १,२३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएडची प्रवेश परीक्षा २४ मार्च आणि फिल्ड परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. एमएडची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होईल. ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.