Home आपला जिल्हा Breaking News शाळेच्या विकासासह गावाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आवश्यक : डॉ. जयकुमार भसारकर

शाळेच्या विकासासह गावाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आवश्यक : डॉ. जयकुमार भसारकर

50

मूल:_ आजचा काळ हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा असून स्पर्धेत टिकण्यासाठी मराठी शाळा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया आहे. सदर पाया मजबूत करण्यासाठी तसेच शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी सतत संपर्क, संवाद आणि त्यांचे सहकार्य घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे सहायक प्रो. डॉ. जयकुमार भसारकर यांनी केले.

मारोडा येथे आयोजित बिटस्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भिकारू शेंडे होते. विशेष अतिथी पोलीस निरीक्षक विजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अनुप नेरलवार, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश नेतुलवार, उपाध्यक्ष कल्पना वाळके, प्राचार्य गाडेवार, माजी प्राचार्य गंगाधर कुनघाडकर, ग्रामपंचायत सदस्य रितेश जिडगलवार, बंडू गेडाम, व्यवस्थापन समिती सदस्य नरेश देवतळे, विद्या वाढई, अंकिता गुरनुले, गटशिक्षणाधिकारी जयश्री गुजनवार, केंद्रप्रमुख दयाराम भाकरे, जितेंद्र बलकी, राजेंद्र तुमराम आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन विषय शिक्षक ब्रम्हानंद मडावी यांनी तर आभार सचिन बालमवार यांनी मानले.