Home आपला जिल्हा Breaking News आज भेजगाव येथे मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर,जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा-विशाखा शशिकांत...

आज भेजगाव येथे मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर,जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा-विशाखा शशिकांत गणवीर

52

भेजगाव येथे मोतीबिंदू नेत्रतपासणी शिबिर
चंद्रपूर : तालुक्यातील भेजगाव येथे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन, मुंबई, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर व सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क मोतीबिंदू नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मंगळवार, दि. १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत आवारात केले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांची तपासणी, नागपूर येथे ने- आण, शस्त्रक्रिया तसेच राहण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णतः मोफत असणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका विशाखा शशिकांत गणवीर यांनी केले आहे.