जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या विदर्भातील पहिल्यावहिल्या शाखेची स्थापना करीत जनजागृतीसाठी वर्षभरापूर्वी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे कार्य, लोकांचा विश्वास, आणि प्रशासनाची साथ यामुळे त्यांचा कल्पवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही,मात्र यासाठी अभ्यास, सातत्य, आणि समर्पण तसेच यशस्वीतेचा विश्वास असणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या प्रथम वर्धापनदिन सोहळा कार्यक्रमाचे निमित्ताने अध्यक्षस्थानावरुन बोलताना केले.
जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या विदर्भातील अधिकृत पहिल्या शाखेची रितसर स्थापना १२जानेवारी २०२५रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभमुहूर्तावर मूल तालुक्यातून करण्यात आली होती,या निमित्ताने मूल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, आज या शाखेने आणि विदर्भातील संघटनेच्या कार्याने एक वर्षे पूर्ण केले आहे आणि या वर्षेभरात शासनदरबारी, शैक्षणिक,सामाजिक राजकीय, धार्मिक व आर्थिक क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात आपल्या कार्याची दखल घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी जनतेला सहकार्य करीत आपली एक छबी निर्माण केली आहे, आणि जनतेला जागृत ग्राहक राजा आणि ग्राहक जनजागृती, ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्यातील तरतुदी, फसवणुकीच्या प्रकारांची माहिती आणि त्यापासून बचावाचे विविध पैलू यांची माहिती उपलब्ध होऊ लागली असून फसवणुकीचे बळी पडलेले नागरिक आपल्या फसवणुकीची माहिती देऊ लागले असून त्यावर तक्रार आणि सोडवणुकीसाठी सहकार्यासाठी पुढे येऊ लागले आहे आणि तो विश्वास मिळविण्यात जागृत ग्राहक राजा ही सामाजिक ग्राहक संघटना यशस्वी ठरली आहे , आजच्या घडीला कार्य विस्तार करताना केवळ संख्यात्मक वाढ करण्याचा आमचा मानस नाही हे स्पष्ट करताना कार्यकर्ते जरी मर्यादित असले , तरी त्यांची कामाची व्याप्ती व कार्य अमर्यादित आहे असेही स्पष्ट करताना दीपक देशपांडे यांनी हा वर्धापनदिन सोहळा पार पाडताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आमच्या या कार्यात सहभागी समस्त जनता,ग्राहक,व्यापारी,अधिकारी वर्ग,शेतकरी, कामगार ,समाजकारणी,राजकारणी, आणि आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींना शुभेच्छा देत , अभिनंदन केले आणि यानंतरही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली व या कार्यातून राष्ट्र उभारणीसाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.
जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांताच्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन सोहळा मूल येथे वार्ड क्रमांक १५मध्ये रमेश डांगरे सचिव मूल तालुका शाखा मूल यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता,या सोहळ्यानिमित्त कमलेश खाडे, मोटार वाहन निरीक्षक गडचिरोली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मैदमवार, सचिव रमेश डांगरे, कार्यकारिणी सदस्य डॉ आनंदराव कुळे, तुळशीराम बांगरे,मायाताई कडवलवार,रजनी झाडे, नंदा डांगरे, प्रविण भरतकर आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद आणि ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतिर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले,अतिथींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मैदमवार यांनी केले, व संघटना स्थापन करण्याची कारणमीमांसा करताना आजवरच्या कार्याचा आढावा घेतला तर डॉ आनंदराव कुळे यांनी संघटना विस्तार आणि ग्राहक व्यापारी तसेच अधिकारी यांचे समन्वयातून कशाप्रकारे अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले याबाबत सविस्तर आढावा घेतला.
रमेश डांगरे यांनी आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून आपल्या प्रयत्नांना कसे यश लाभले, किती बिकट समस्या सोडविण्यासाठी कशाप्रकारे सातत्याने पाठपुरावा करावा लागला त्यासाठी कशा प्रकारे सातत्याने पाठपुरावा केला याबाबत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना कमलेश खाडे यांनी आज ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ऐकायला मिळत असताना ग्राहक जागृती साठी विदर्भात जागृत ग्राहक राजा चे कार्य वाखाणण्याजोगे आहे आणि त्यांच्या निस्वार्थी कार्यामुळे जनतेला त्यांच्या अधिकारांची जाणीव होत असून समाजाने अशा कार्याची दखल घेण्याची व सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
परिवहन विभागाचे वतीने जानेवारी हा महिना रस्ता सुरक्षा महिना म्हणून पाळला जात असून सर्वसामान्य नागरिकांनी वाहन चालवताना , डोक्यावर शिरस्त्राण (हेल्मेट) वापरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगून कायद्याचे पालन करुन प्रवास करण्याचे आवाहन केले, आणि आमची इच्छा नसतानाही आम्हाला तुमच्या व इतरांच्याही संरक्षणासाठी कार्यवाही करावी लागते त्यामुळे बऱ्याचदा गैरसमजही होतो असेही स्पष्ट केले , तसेच या ग्राहक संरक्षण कायद्याचे ही आहे आणि म्हणूनच त्यांची माहिती झाली पाहिजे ती आपण करुन घेतली पाहिजे आणि अन्याय व फसवणुकीच्या प्रकारांचा सामना करण्यासाठी पुढे येत तक्रार करुन न्याय मिळवून घेतला पाहिजे असे जनतेला आवाहन केले.
या कार्यक्रमात, नागरिक ,संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






