Home आपला जिल्हा Breaking News प्रेरणा सेतू केंन्द्रात गाडगे महाराज यांची पुण्यतिथी

प्रेरणा सेतू केंन्द्रात गाडगे महाराज यांची पुण्यतिथी

65

मूल :— येथील जागृत ग्राहक राजा मूल तालुका संघटनेच्या वतीने 20 डिसेंबर 2025 रोजी प्रेरणा आँनलाईन सेवा केंद्रात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्रात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुण्यतिथीनिमित्त पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा संघटनेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे होते.
गाडगेबाबा हे परिवर्तनवादी संत होते.त्यांनी प्रत्यक्ष ​कृतीतून समाज जागृतीचे कार्य केले. लोकवर्गणीतून शेकडो शिक्षणसंस्था काढून शिक्षणाची गंगा आणली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आणि आजतागायत तो राबविण्यात येत आहे.

संत गाडगे बाबा यांनी हातात खराटा घेऊन दिवसा गाव स्वच्छ केले.सोबतच आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून रात्री
लोकांच्या मनातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न केले.ते एक आधुनिक विज्ञानवादी संत होते व आजही संत गाडगेबाबांचे विचार सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन मशाखेत्री यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले..

जागृत ग्राहक राजा संघटनेचे सचिव डांगरे सर यांनी सुत्रसंचाालन केले.प्रेरणा सेतू केंन्द्राची ऑपरेटर सौ.नमिता मनोज नवघडे यांनी आभार मानले.यावेळी डॉ.किशोर लाकडे,डॉ.कुळे, मायाताई कडवलवार व इतर महिला तसेच नागरीक उपस्थित होते.