Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अमित राऊत यांचे दुःखद निधन

मूल शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अमित राऊत यांचे दुःखद निधन

59
मूल – शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अमित राऊत यांचे दुःखद निधन
मूल शहरातील ओळख निर्माण केलेले तरुण सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अमित राऊत यांचे काल मध्यरात्री साडेबारा वाजता दुःखद निधन झाले. सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसी परिसरात झालेल्या छोट्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या दुर्घटनेनंतर ते कोमात गेले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरची श्वास घेतला.
अमित राऊत यांच्या निधनाने मूल शहरातील सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता आणि त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे, सर्वांना सहज उपलब्ध असणारे आणि सकारात्मक दृष्टीकोनातून काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगा, आई आणि भाऊ असा परिवार आहे.