… अन्यथा नागरिकांना नाही मिळणार शासनाचे लाभ
अलिकडच्या काळात ओळखीचा पुरावा म्हणून आधारला महत्व प्राप्त झालेले आहे. नागरिकांना केंद्र तसेच राज्य शासनाचे लाभ घेण्याकरीता आधार कार्ड अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड अद्यावत नसेल तर लाभ मिळणार नाहीत. तसेच ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढलेली आहेत. अशा आधार कार्ड धारकांनी प्रत्येक १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करावे असे, सुटीच्या दिवशी सुध्दा शनिवार, ला तहसील मूल मधील आधार केंन्द्र चालू राहणार आवाहन पराग खोब्रागडे आधार संचालक
आधार योजना सुरु झाली तेव्हा आवश्यक कागदपत्रे ज्यांनी दिले नाहीत. त्यांना आता आधारमध्ये असलेले नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आदी अद्यावत करावे लागेल. तसेच डोळयांची बुबुळे, बोटांचे ठसे, चेह-याचे सुधारित छायाचित्र द्यावे लागणार आहे. आधार कार्ड काढल्यानंतरही दर ५ ते १० वर्षांनी आधार कार्ड अद्यावत करावे लागते. विशेषतः घराचा पत्ता बदललेला असेल तर किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर त्यांना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे, चेह- याचे बदललेला मोबाईल क्रमांक आदींमध्ये बदल करता येतो.
पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर संबंधित केंद्राकडे आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. मुलाचे आधार कार्ड काढायचे असेल तर वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रीक तपशील अपडेट करणे बंधनकारक असून, ही प्रक्रिया निःशुल्क आहे. यासाठी जन्म प्रमाणपत्र, मार्क शीट्स, ओळखीचा पुरावा, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आदी वैध ओळपत्र आवश्यक आहे.
ज्या नागरिकांनी अद्याप आधार कार्ड काढले नसतील त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड काढून घ्यावे. तसेच ज्या नागरिकांचे आधार कार्ड काढलेले आहे. अशा नागरिकांनी आपले आधार अपडेट करुन घ्यावे. सुटीच्या दिवशी सुध्दा शनिवार ला तहसील मूल मधील आधार केंन्द्र चालू राहणार असे आवाहन पराग खोब्रागडे आधार संचालक यांनी केले आहे.
कागदाची गरज संपली! नवीन आधार ॲप देणार आता डिजिटल ओळख
नवीन आधार अॅपद्वारे कागद न वापरता ओळख शेअर करता येईल आणि आधारशी संबंधित पूर्ण किंवा निवडक माहिती पडताळून पाहण्याचा पर्याय मिळेल. एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली असून नवीन आधार अॅप तयार करण्याचे काम सुरू आहे.
यूआयडीएआयच्या निवेदनानुसार, “नवीन आधार अॅप कागदविरहित ओळख शेअर करणे, पूर्ण किंवा निवडक आधार माहिती पडताळणे आणि शेअर करणे, तसेच आधार अद्ययावत (अपडेट) करण्याची सुविधा देईल.” याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
फोटोकॉपीचा वापर कमी होणार
या अॅपचा उद्देश आधारधारकांसाठी ऑफलाइन डिजिटल पडताळणीला प्रोत्साहन देणे आणि आधार कार्डाच्या फोटोकॉपीचा वापर कमी करणे हा आहे. यावेळी यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार म्हणाले की, नवीन अॅप ऑफलाइन पडताळणीला अधिक चालना देईल. ऑफलाइन पडताळणी ओळख पडताळणी करण्याचा एक सुरक्षित, सोयीस्कर आणि गोपनीयता राखणारा मार्ग ठरेल.






