Home आपला जिल्हा Breaking News ई- केवायसीची सुविधा पूर्ववत सुरू@ तरच मिळेल शेतकऱ्यांना अनुदान

ई- केवायसीची सुविधा पूर्ववत सुरू@ तरच मिळेल शेतकऱ्यांना अनुदान

111

जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी ई- केवायसी करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये मूल तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या डाटा ऑनलाइन ई- पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून  निधी वाटप करण्यात आलेला आहे. सध्या ई- केवायसीची सुविधा पूर्ववत सुरू केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही त्यांनी आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन  केले आहे. अद्याप ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी सातबारा उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अॅग्रिस्टॅक नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले.

आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना कळविण्यात येते की, शेतकऱ्यांना दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी E-KYC सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व केंद्रचालकांनी आपल्या केंद्रावरून संबंधित शेतकऱ्यांची E-KYC प्रक्रिया तत्काळ व प्राधान्याने पूर्ण करावी.