Home आपला जिल्हा Breaking News मूल नगराध्यक्षपदासाठी 02 तर नगरसेवकांसाठी 51नामांकन दाखल अर्ज शेवटचा दिवस

मूल नगराध्यक्षपदासाठी 02 तर नगरसेवकांसाठी 51नामांकन दाखल अर्ज शेवटचा दिवस

69

 मूल नगर परिषद साठी येत्या २ डिसेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. आज सोमवार ला
नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
नगराध्यक्षपदासाठी 02,नगरसेवक पदासाठी 51, नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
मुल नगरपरिषदेत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी एकता समर्थ यांनी तर शिवसेनेकडून भारती राखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.मूल नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांकडे अखेरच्या दिवशी इच्छुकांची गर्दी
दोन्ही पक्षामध्ये फेरबदल होत असल्याने पक्षाचे उमेदवार आजच निश्चित होणार मूल  राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मूल नगर परिषदेची निवडणूक येत्या २ डिसेंबरला होत असल्याने नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात असल्याने चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटी नंतर होणारी ही निवडणूक अतिशय चुरशीची रंगतदार व राजकीय अस्तित्वाची होणार असल्याची चर्चा मूल नगरात केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांची कार्यालय व नेत्यांच्या घरी गर्दी वाढविली असुन आपल्या पसंतीच्या प्रभागात नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी देत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक रिंगणात इतरही राजकीय पक्षाचे उमेदवार असले तरी खरी लढत मात्र ही भाजपा काँग्रेस उमेदवातच होत असल्याचा आजवरचा राजकीय इतिहास आजही जमा आहे.पक्ष मूल नगर परिषदेची सन
२०११ च्या जनगणेनुसार लोकसंख्या २५४४९ असुन मतदारांची संख्या २१७४५ आहे. नगराधक्षपद पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने पुन्हा मागील प्रमाणे यावेळी देखील
महिलेलाच नगराध्यक्षपदाचा मान मिळणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये चुरस वाढली आहे. सत्तेसाठी आतुर असलेल्या राजकीय पक्षाचे नेते नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. सत्तारूढ असलेल्या भाजपा मध्ये नगराध्यक्षा पदासाठी अनेक महिला उमेदवार इच्छुक असुन इतर पक्षापेक्षा भाजपमध्ये जास्त प्रमाणात चढाओढ दिसत आहे. त्यामुळे भाजपा मध्ये उमेदवारीसाठी मोठी रांग लागली आहे. तरी देखील विरोधात असलेल्या काँग्रेसने देखील इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याने काँग्रेसमध्येही उमेदवारांसाठी चांगलीच चढाओढ सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी फुटीनंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र्य नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी व इतरही पक्ष आपले नशीब आजमावत असल्याचे दिसून येत आहेनगर परिषद मूल येथे १० प्रभाग व २० वार्ड राहणार असुन मागील पेक्षा या निवडणुकीत ३ नगरसेवकाची जास्त असणार आहे. महिलांसाठी ५० टक्के राखीव असल्याने १० नगरसेवकांसह नगराधक्ष देखील महिलाच
असणार आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या सभागृहात महिलांची संख्या जास्त असणार आहे. मागील निवडणूक सन २०१६ मध्ये झाली होती. पाच वर्षाच्या कालावधी नुसार ही निवडणूक सन २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र तब्बल ४ वर्षांनंतर ही निवडणूक होणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष सत्तेसाठी आतुर असल्याचे दिसून येत आहे. सर्व राजकीय नेत्यांनीपक्षाच्यानगराध्यक्षासह नगरसेवकाच्या उमेदवारीवर पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्यांचा प्रचारकरणार असल्याचे सांगत असले तरी स्थानिक नेत्याच्या शिफारशीनुसारच अंतिम उमेदवार ठरविले जाणार आहे. असे असले तरी दोन्ही राजकीय पक्षाने कुणाला तरी आपला उमेदवार निश्चित करतील तेव्हा मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी मी अपक्ष उभे राहण्याची भाषा बोलायला लागले आहे. एकंदरीत ही निवडणूक भाजप काँग्रेसमध्ये चुरशीची रंगतदार होत असली तरी
सुद्धा इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारही मध्येमध्ये मुसंडी मारतील असा अंदाज वर्तविला जात आहे. (ता.प्र.)