Home आपला जिल्हा Breaking News बेंबाळ@वाहनामध्ये कोंबून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी उघड

बेंबाळ@वाहनामध्ये कोंबून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी उघड

57

मालवाहू वाहनामध्ये कोंबून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी उघड
चौघांवर गुन्हा दाखल : एलसीबीची कारवाई
चंद्रपूर : तेलंगणाकडे कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे (गौवंश) वाहतूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण १७ जनावरे व एक पिकअप वाहन असा सहा लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समर्थ नागेश पुप्पलवार (२१), मुन्ना शामराव मुद्रिक दोघेही रा. बेंबाळ, स्वप्निल फुलझेले रा. बेंबाळ, अशपाक कुरेश व रहमान कुरेश, गोंडपिपरी असे आरोपींचे नाव आहे.
१० नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस स्टेशन मूल हद्दीत मौजा बेंबाळ येथून एक पिकअप वाहनातून गोवंश जनावरे
तेलंगाणाला कत्तलीसाठी नेत आहेत. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने
बेंबाळ येथे सापळा रचला. तपासादरम्यान संशयित पिकअप वाहन ३४ सीक्यू ०६९४ येताच पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता पाच जनावरे वाहनात दाटीवाटी भरलेली आढळली, वाहनाखाली आणखी १२ जनावरे बांधलेली मिळाली. वाहनातून १७ जनावरांची सुटका करुन आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांची विचारणा
केली असता ही जनावरे तेलंगणाला कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पीएसआय विनोद भुरले, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, प्रदीप मडावी, अजीत शेंडे
मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
मूल शहरातून कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक होत असतानाही मूल पोलिसांना रोखण्यात अपयश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक थेट मूल तालुक्यातील बेंबाळ येथे जाऊन नाकाबंदी करून कारवाई करते, ही बाब मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.