मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याता १५०० रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो.
आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेही आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC) पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्टकरुन ओटीपीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितली. ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC) करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे, या तारखेच्या आधी लाडक्या पात्र बहिणींना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC : १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e- KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश ताडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.” आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाडक्या बहिणीनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
Aditi S Tatkare
@iAditiTatkare. Follow
X
–
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया
कशी पूर्ण कराल?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
– मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
– या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक
– जर आधार क्रमाक पात्र यादीत असल, तर पुढील टप्प्याला जाता येइल. – यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी
प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/ उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit
बटण दाबावे.
3. शेवटी, ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.






