Home आपला जिल्हा Breaking News मेगा पोलिस भरती प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात

मेगा पोलिस भरती प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात

70

 महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५ हजारांपेक्षा जास्त पोलिस पदांची भरती प्रक्रिया २९ ऑक्टोबर सुरू होत आहे. त्यामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ या पदांचा सामावेश आहे. याबाबत पोलिस भरतीच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही एक विशेष संधी देण्यात आली आहे.


गेल्यावर्षी १८ हजारांपेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया पार पडली होती. याही वर्षी १५ हजारांपेक्षा जास्त पदांची ही मोठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत एक महिना असणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार एकास दहा प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतसुद्धा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.