तांत्रिक अडचणींचा सामना करता करता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. केवायसीची सक्ती आहे, पण लिंक नाही. अखेर शासनाच्या मदतीपासूनही वंचित राहावे लागत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी दिलासा मिळण्याऐवजी कोंडीत सापडला आहे. अशावेळी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची किंवा केवायसीत सवलत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
सततच्या पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाने रुपये मदत जाहीर केली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. परंतु, केवायसी नसलेले शेतकरी या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत.
मूल परिसरातील अनेक शेतकरी या मदतीला मुकले आहे.
एकीकडे केवायसी सक्तीची केली जात आहे. मात्र, यासाठी तांत्रिक बाजू सक्षम केली जात नाही. बँकेचे खातेदार केवायसी करण्यासाठी सेतू केंद्रात जातात, तेव्हा तिथे रांगा असतात. रांगेत तासनतास उभे राहिल्यानंतर काही
रक्कम वेळाने लिंक नसल्याचे जाहीर केले जाते. कामधंदा सोडून, मजुरी बुडवून नागरिक या कामाच्या मागे असतात. तरीही प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय खात्यात जमा होणार नाही. केवायसीकरिता शेतकऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे तांत्रिक अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे. ई-केवायसीच्या प्रक्रियेत
शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोनही खर्च होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच त्रस्त झालेले आहे. या प्रक्रियेने अधिक डोकेदुखीची आहे.
दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन ठरले फोल
आमच्या शेतातील मूल तालुक्यातील शेतात धानपीक पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने भरपाई म्हणून रुपयांची मदत जाहीर केली. दिवाळीपूर्वी ती रक्कम खात्यात जमा होईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही, असे मूल येथील शेतकरी यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांची ई- केवायसी झालेली नाही. त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण तातडीने दूर व्हावी, असे ते म्हणाले.
Home आपला जिल्हा Breaking News तांत्रिक अडचणीत अडकली मदत@शेतीपिकाच्या नुकसानीची रक्कम जमा झाली नाही…






