Home आपला जिल्हा Breaking News नुकसानभरपाई मिळण्यात ‘आधार प्रमाणीकरण’अडथळा@ 1201 शेतकरी मदतीपासून वंचित

नुकसानभरपाई मिळण्यात ‘आधार प्रमाणीकरण’अडथळा@ 1201 शेतकरी मदतीपासून वंचित

78

नुकसानभरपाई मिळण्यात ‘आधार UID सेवा प्रतिसाद देत नाही. कृपया काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा’ चा मॅसेज अडथळा; 1201 शेतकरी मदतीपासून वंचितमूल गावासह तालुक्यातील इतर गावात गेल्यावर्षी झालेल्या शेती पिकांचे झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याने भरपाई मिळण्यात अडथळे येत आहे.यादीतील शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंन्द्रात गेल्याने विशीष्ट क्रमांक नंबर टाकल्यानंतर शेतक—याचा नाव गट क्रमाक बाधित क्षेत्र हेक्टर वितरीत केलेली रक्कम आधारनुसार शेतक—याचे नाव,शेतकरी आयडी बॅंकेचे नाव,बचत खाता,मोबाईल नंबर त्यांना No grievance त्यानंतर Aadhaar Number टाकल्यानंतर ओटीपी क्लिक केल्यांनतर UID Service is not Responding. Please try again later in sometimeयुआयडी अरेर असा मॅसेज 25 दिवसापासून येत असल्याने नागरीक सेवा केंन्द्रातून वापस जात असून झालेली नुकसान भरपाईग् ची केव्हासी होत नसल्याने दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आलेली दिसून येत आहे.ऑगस्ट व सप्टेबर या काळात मूल तालुक्यातील दहेगाव चक,गडीसूर्ला,राजगड,वेडीरीठ,दुगाळा माल,राजगड व तालुक्यातील इतर गावे 1201 शेतकरी झालेल्या अतिवृश्टीने झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले होते. त्यांना मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना मदत जाहीर झाली असून गावातील शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याने लवकरात लवकर दुरूस्ती करून देण्याची मागणी शेतकरी वर्गानी केलेली आहे..