Home आपला जिल्हा Breaking News विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, बेंबाळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे....

विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, बेंबाळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” साजरी.

84

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ ला विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्या वाचन प्रेरणा दिन “अग्निपंख” या आत्मचित्राचे वाचन करून साजरा केले.
या कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे NSS समन्वयक यांनी केले. “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा. सुभाष सोनुले यांनी केले. संचालन प्रा. संघपाल रामटेके यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रफुलचंद भसारकर यांनी केले आणि या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते