आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मूल बसस्थानकासमोर बस व ट्रांझिट मिक्सर ट्रक यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
MH07 C 9313 राज्य परिवहन महामंडळ ची बस पोंभुर्णा वरून भेजगाव मार्गे मूलकडे येत असताना,
बसस्थानकासमोर तेलंगणा राज्यातील भिवापूर वरून सिंदेवाहीकडे जाणाऱ्या ट्रांझिट मिक्सर ट्रक (क्रमांक TS22 T (1061) ने बसला धडक दिली.या अपघातात बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
Post Views: 127