Home आपला जिल्हा Breaking News ‘आधार’ अपडेट आत्ताच करुन घ्या! ‘या’ तारखेपासून दर वाढणार, नवे शुल्क किती?१०...

‘आधार’ अपडेट आत्ताच करुन घ्या! ‘या’ तारखेपासून दर वाढणार, नवे शुल्क किती?१० वर्षांपूर्वी अपडेट झालेले नसेल?

74

Aadhaar Update : ‘आधार’ अपडेट आत्ताच करुन घ्या! ‘या’ तारखेपासून दर वाढणार, नवे शुल्क किती? वाचा
Aadhaar Update Fee Hikes from Oct 1, 2025 आधार कार्डमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने एक अत्यंत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे.
येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार अपडेटसाठी नवे शुल्क आणि नियम लागू होणार आहेत…
जर तुम्ही गेल्या १० वर्षांत आधार अपडेट केले नसेल, तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत| UIDAI चे सीईओ भुवनेश्वर कुमार यांनी सांगितले आहे की, १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे, अन्यथा ते अवैध होऊ शकते.
१ ऑक्टोबरपासून लागू होणारे नवे शुल्क (Aadhaar Update Fee Hikes) आधार कार्डमध्ये कोणत्या प्रकारच्या बदलासाठी किती शुल्क लागेल, याची नवी यादी खालीलप्रमाणे आहे, हे दर वाढलेल्या स्वरुपात आहेत, त्यामुळे आताच आधारकार्ड अपडेट करुन घेणे श्रेयस्कर आहे अन्यता १ ऑक्टोबरपासून तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल.
सुधारणेचा प्रकार नवे शुल्क सध्या लागू जुने शुल्क
सामान्य सुधारणा (उदा. नाव, पत्ता) ₹७५ ₹३०
बायोमेट्रिक अपडेट (फिंगरप्रिंट, आयरीस, फोटो) ₹१२५ ₹५०
मुलांचे बायोमेट्रिक अपडेट (७ ते १७ वर्षे) ₹१२५ ₹५०
नवीन आधार कार्ड काढणे १० ( विनामूल्य) २० (विनामूल्य) ५-७ आणि १५-१७ वर्षे वयोगटातील मुलांचे
अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट २० (विनामूल्य) २० (विनामूल्य) आधार कार्डावरील ‘या’ दोन मोठ्या गोष्टी बदलणार
पहिला बदल
१ ऑक्टोबर २०२५ पासून शुल्कात वाढ होण्याव्यतिरिक्त, आधार कार्डावरीत काही महत्त्वाची माहिती देखील बदलणार आहे. या मध्ये वडील/ पतीचे नाव हटवले जात आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या आधार कार्डावर पिता किंवा पतीचे नाव दिसणार नाही. ही माहिती फक्त UIDAI च्या रेकॉर्डमध्ये ठेवली जाईल
दुसरा बदल
जन्मतारीख आणि केअर ऑफ कॉलम: आता कार्डवर जन्मतारीख केवळ
वर्षांच्या स्वरूपात दिसेल. तसेच, ‘केअर ऑफ’ (Care Of) हा कॉलम कार्डवरून हटवण्यात आला आहे.
अद्ययावत प्रक्रियेसाठी नवे नियम
जानेवारी २०२५ पासून पत्ता आणि इतर सुधारणांसाठी कठोर नियम लागू होतील. माहिती अपडेट आवश्यक कागदपत्रे
पत्ता बदल (जानेवारी २०२५ पासून) केवळ बँक स्टेटमेंट किंवा युटिलिटी बिल (उदा. वीज बिल) मान्य असेल,
इतर सुधारणा (उदा. ओळख / जन्मतारीख) पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र (Voter ID) किंवा जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate) आवश्यक.
डिजिटल आणि अनिवार्य प्रक्रिया
१ ऑक्टोबर २०२५ पासून आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असेल.
वापरकर्ते UIDAI च्या वेबसाइट किंवा mAadhaar अॅपवर रिक्वेस्ट सबमिट
करतील आणि नजीकच्या आधार केंद्रावर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेता येईल.
हे महत्वाचे लक्षात असू द्या…
जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांपूर्वी अपडेट झालेले नसेल, तर हे शुल्क
वाढण्यापूर्वी त्वरित आवश्यक कागदपत्रे जमा करून अपडेट करून घ्या, अन्यथा तुमचे आधार कार्ड अवैध ठरू शकते.