Home आपला जिल्हा Breaking News सेवानिवृत केंद्रप्रमुख हत्या@आणखी दोघांना अटक

सेवानिवृत केंद्रप्रमुख हत्या@आणखी दोघांना अटक

72

पळवलेले सोन्याचे दागिने व हत्येसाठी वापरलेला पाईप जप्त

मूल : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनील गेडाम यांच्या हत्या प्रकरणात मूल पोलिसांनी किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद या मुख्य आरोपीला घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. तो पोलिस कोठडीत असताना मूल पोलिसांनी सोमवारी दशरथ कचरू भोयर (४०), सुरेश टिल्लू गेडाम (४५) रा. टेकाडी या दोघांना सोमवारी ८ वा. अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. ज्या लोखंडी पाईपने डोक्यावर वार करून हत्या केली होती, तो पाईपसुद्धा पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातून जप्त केला आहे.
उसनवारी दिलेले सहा लाख रुपये परत न दिल्याने गेडाम यांची हत्या केल्याचा बनाव किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद याने केला होता. मात्र पोलिस कोठडीत पोलिसांनी कसून चौकशी केली असता आर्थिक चणचणीतून मृताच्या अंगावरील दागिन्याच्या लालसेपोटी हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. घटनेच्या दिवशीपासून आरोपींच्या अंगावरील गायब असलेले गळ्यात सोन्याची गोप, बोटात दोन अंगठ्या व कानात बाली असा मुद्देमाल पोलिसांनी सय्यद याच्या घरातून जप्त केला आहे. पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुबोध वंजारी करत आहे.
असा शिजला हत्येचा कट
किस्मतने एका व्यक्तीकडून खरेदी केले होते. मात्र त्याने धानाचे पैसे दिले नसल्याने तो पैशासाठी
तगादा लावत होता. यासोबतच किस्मतने अनेकांकडून उसनवारी पैसे घेतले होते. त्यामुळे ‘तो’ आर्थिक चणचणीत होता. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुनील टेकाडी येथे शेतीवर गेला असता त्याची किस्मतसोबत भेट झाली. यावेळी सुनीलच्या अंगावर दागिने बघून किस्मतची नियम फिरली. त्याने सुनीलची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याचा कट रचला अन् रात्री सुनीलला जेवणासाठी हॉटेलमध्ये नेऊन परत येताना त्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला.