३१ मेपूर्वी शेतकऱ्यांनी फॉर्मर आयडी काढावी, असे आवाहन मूल तालुका कृषी अधिकारी- सुनील करडवार

23

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य
मूल : महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे दि. १४ ऑक्टोबर २०२४ चे शासन निर्णयान्वये राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतिने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उदिष्टाने राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा वत्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच तयार करण्यात येऊन शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहीतीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या सर्व शेतांसह एकत्रीतरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे. दि. ११ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयान्वये कृषि विभागमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) दि. १५ एप्रिल २०२५ पासुन अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) सेतु केंद्रातुन तयार करुन घ्यावा. अन्यथा कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभ घेता येणार नाही. शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे १. सातबारा (सर्व शेतांचे) २. आधार कार्ड ३.मोबाईल क्रमांक अत्यावशक
असल्याचे एस.करडवारतालुका कृषि अधिकारी,मुलयांनी कळविले आहे.