Home आपला जिल्हा Breaking News माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जाहीर झालेल्या मानांकनात नागपूर विभागातून नगर परिषद...

माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जाहीर झालेल्या मानांकनात नागपूर विभागातून नगर परिषद मुल ने प्रथम क्रमांक

108

माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जाहीर झालेल्या मानांकनात नागपूर विभागातून नगर परिषद मुल ने प्रथम क्रमांक पटकावून 75 लक्ष रुपये बक्षीस रक्कम प्राप्त केले यात श्री श्रीकांत समर्थ अभियंता पाणी व स्वच्छता विभाग,श्री. अभय चेपुरवार आरोग्य निरीक्षक ,श्री. आलेख बारापात्रे शहर समनव्ययक व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

पर्यावरणपूरक उपाययोजना, स्वच्छता, पाणी संवर्धन, वृक्षारोपण आणि हरित शाश्वततेबाबत केलेल्या कामगिरीमुळे मिळालेले हे बक्षीस संपूर्ण नगरपरिषदेच्या आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.श्री. संदीप दोडे मुख्याधिकारी

हा सन्मान भविष्यात आणखी प्रेरणा देईल आणि पर्यावरणाच्या दिशेने अधिकाधिक सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करेल याची खात्री आहे.

आम्हाला आपल्या या यशाचा अभिमान असून, भविष्यातही असेच सहकार्य आणि यश संपादन करण्याची अपेक्षा करतो.
धन्यवाद!