Home आपला जिल्हा Breaking News मुल शहरातील गांधी चैकातील घटना@प्रजोत गेडाम भावपुर्ण श्रद्धांजली

मुल शहरातील गांधी चैकातील घटना@प्रजोत गेडाम भावपुर्ण श्रद्धांजली

233

मुल:-काल रविवारच्या रात्रौस 10.30 वाजता ची घटना भरधाव वेगाने सिमेंट भरलेला टॅक चैकामध्ये विकत असलेल्या आईसक्रिमच्या गाडी स्पर्श करून गेल्याने गांधी चौक मधे मेडीकल चा पुढे …हा अपघात झालेला असून एका तरूणाचा जिव गेलेला आहे.मुलगा चोरगाव तह चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर येथील आहे .

मुल शहरातील श्रीकृष्ण ग्रुपच्या माध्यामाने घडलेली घटना माहिती होताच मुल शहरातील नागरीक,तरूण ए कच वेळेस गांधी चैकात गार्दी रात्रौ जमाव दिसून आला सगळे नागरीक कसं झाला अपघात दु‘खाचा वातावरण दिसून येत होता.

मूल येथील गांधी चौकातील घटना
उन्हाळयाचे दिवस असल्याने टेकाडी Sindewahi वरुन चंद्रपूरकडे
येथुन मूल येथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेल्या युवकांवर सिंदेवाही जाणाÚया वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका युवकाला
`धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मूल येथील गांधी चौकात रविवारी रात्रौ 10 वाजताच्या दरम्यान
घडली. प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे
मूल तालुक्यातील आकापूर येथील देवि
रा. चोरगाव असे मृत्तक युवकाचे नांव आहे.
नर्सिंग विद्यालयात नर्सोंगचे कोर्स करीत असलेल्या प्रज्योत
नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगांव त. चंद्रपूर हा विद्यार्थी आपल्या काकाकडे टेकाडी येथे राहात होता, रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने तो अनिकेत गोंगले वय 19 वर्षे आणि मुस्ताक अल्ली सय्यद वय 21 वर्षे रा. टेकाडी यामित्रांसोबत मूल येथे आला,
दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकानातुन तो आईस्क्रिम घेवुन खात असतानाच सिंदेवाही वरुन चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच 40 बि जी 8268 चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी वय 55 वर्षे रा. नागपूर याचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने तो प्रज्योत नरेंद्र गेडाम यांना जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला, इतर जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही. मृत्तकाचे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाहीकांच्या सुपुर्द करण्यात आले.
आरोपीवर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अॅक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अमलदार यशवंत कोसनशिल्ले, रफीक शेख करीत आहे.

जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात, ती भरून काढणे कधीही शक्य नसते, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली..