Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती उत्सव संपन्न

मूल येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती उत्सव संपन्न

74

मूल : ग्रामोत्थानाच्या दृष्टीने ग्राम विकासाची सुत्रबध्द, आदर्श संकल्पना ग्रामगीता या चिंतनशील ग्रंथातुन ४१ विषयांवर लेखन करुन समाजाला परिवर्तनाची योग्य दिशा देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस ग्रामजयंती उत्सव अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका मुल, पतंजली योग समिती आणि श्री गुरुदेव बचत गट मूल च्या वतीने योग भवन प्रार्थना मंदिर मुल येथे दिनांक ३० एप्रिल २०२४ रोज मंगळवारलासाजरा करण्यात आला.सायंकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यातआली आणि सामुदायिक प्रार्थनाविषयीग्रामगीताचार्य नामदेव पिजदुरकर यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी पतंजली योग
समिती मुल चे अध्यक्ष प्रभाकर भोयर, ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले, प्रा. वसंतराव ताजने, प्रा. किसनराव
वासाडे, अनिल गांगरेड्डीवार, गुरूदेव बोदलकर, चंद्रशेखर पिदुरकर सितकुराजी देशमुख, डॉ. हरिहर बेलसरे, ग्रामगीताचार्य विजय लाडेकर, भगवान मंडलवार, अंबादास राजनकर, मुक्तेश्वर खोब्रागडे, विजेंद्र वरगंटीवार, मोतीराम वाघमारे, कोंडावार, मोरेश्वरजी, रवि कोटलवार, निलेश माथनकर, बुरांडेजी, राजु चल्लावार, किशोर भडके, सुचिता बुक्कावार, अल्का कामडी, अरुणा
गांगरेड्डीवार, वरगंटीवार, अनुश्री ठिकरे, राजश्री मोहबंशी, भांडारकर, कावळे, लिला वाळके, रामटेके आदींसह सर्व श्री गुरुदेव उपासकमंडळींची उपस्थिती होती. रामधुन प्रार्थना स्थळी आल्यानंतर ग्राम अध्याय वाचन, दुपारच्या सत्रात गुरुदेव सेवा मंडळ शाखा सिं येथील मंडळी गणपत चल आनंदराव भांडेकर, बालाजी बु प्रकाश वासेकर, संतोष चलाख, वासेकर, छत्रपती भुरसे, बंडु चा विनोद घोंगडे, भोजराज चल,दिलीप कोतकोंडावार यांनी भजन दिली.
मूल येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती उत्सव संपन्न
पहाटे ४ वाजता मुल येथील गांधी चौक परिसरात स्वच्छता करून,सकाळी ५ वाजता सामुदायिक ध्यानपाठ आयोजन करण्यात आले, ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर यांनी सामुदायिक ध्यानावर चिंतन प्रस्तुत केले त्यानंतर योग भवन ते गांधी चौक या मुख्य मार्गाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीसह रामधून काढण्यात आली. रामधुन मिरवणूक मुल येथील चौकात पोहचल्यावर श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ उपासक गिरमाजी भोयर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामगीताचार्य शरदभाऊ सहारे यांनी रामधुन आणि ग्रामजयंती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.