Home आपला जिल्हा Breaking News महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा वेळापत्रक जाहीर

108

 महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे २०२३-२४ चे वेळापत्रक जाहीर झाले असून, ही परीक्षा २० एप्रिलला होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नीट, जेईई, सीईटी व इतर स्पर्धा परीक्षेचे बीज रुजावे, त्यांना भविष्यात येणाऱ्या एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांची माहिती मिळावी, या उद्देशाने इयत्ता आठवी, नववी व दहावीसाठी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेची सुरुवात ३० वर्षांपूर्वी झाली. या स्पर्धेचे फलित म्हणजे महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञावंत झाले व त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला.
लहान वयातच स्पर्धा परीक्षेची आवड व प्राथमिक माहिती मिळावी सुरुवात झाली. या परीक्षेस महाराष्ट्रातून एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले. ही परीक्षा यंदा २० एप्रिल रोजी होत आहे. या परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची मुदत ३० जानेवारी असून, आवेदनपत्र समन्वयकांकडे जमा करावीत. जे विद्यार्थी ऑनलाइन यंत्रणेचा वापर करू इच्छितात, त्यांच्यासाठी www.mtsexam.org या संकेतस्थळावर फॉर्म भरून पाठविता येईल. समन्वयकांच्या माध्यमातून फॉर्म भरल्यास परीक्षा फी रुपये २०० (दोनशे) आणि ऑनलाइन परीक्षा फी रुपये २१५ (दोनशे पंधरा) राहील, याची पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा