मौजा मारोडा येथील कै. वामनरावजी नेरलवार माजी पोलीस पाटील तथा माजी स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांचे २७वे स्मृति प्रीत्यर्थ तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे 194 वी जयंती चे औचित्य साधून कै. वामनरावजी नेरलवार यांचे नातू श्री अनुप प्रदीपरावजी नेरलवार उपसरपंच ग्रामपंचायत मारोडा यांचे कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारोडा येथील उपस्थित विद्यार्थ्यांना प्रत्येक २ नग बूक व १नग पेन वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायती चे सरपंच श्री भिकारू शेंडे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ,सौ अर्चनाताई उईके,माधुरीताई निकेसर दर्षणाताई मेश्राम,सौ शेवंताताई चौधरी सौ.सोनिताई मोहुर्ले
व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 164