Home आपला जिल्हा Breaking News नवभारत विद्यालय मुल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नवभारत विद्यालय मुल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

164

आज दिनांक ०३/०१/२०२४ ला नवभारत विद्यालय मुल येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अशोकराव झाडे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी, सौ. वर्षा भांडारकर, कु. प्रतिमा उमक, कु. दिपा गोंगल, कु. लिना सोमलकर, भारत सलाम, विजय निखारे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन मान्यवर मंडळीच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वागत गित सादर करण्यात आले. कु. कावेरी घोनमोडे ही विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत होती. शाळेत कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षिकेंना डायरी 📖 आणि पेन 🖋️ 🖊️ भेटवस्तू देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या शिक्षिका कु. प्रतिमा उमक यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर गीत, भाषणे दिली. शिक्षक गुरुदास चौधरी, सौ वर्षा भांडारकर, कु. दिपा गोंगल, कु. लीना सोमलकर, विजय निखारे, ताराचंद निमसरकार, निलेश माथनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अशोकराव झाडे यांनी त्या काळातील विधवा पुनर्विवाह, केशवपन, महिलांवरील अत्याचार याबाबत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. साक्षी कामनपेल्लीवर , अंजली चिंचोलकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. सलोनी डोहणे हिने मानले.