मूल तालुक्यातील बेंबाळ येथील तरुण मूल तहसील कार्यालयात एकत्र येत मान. नाम, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई यांचे नावे बेंबाळ येथे MIDC सुरू करण्याबाबत आणि बेंबाळ उपकेंद्र मूल विद्युत कार्यालयाला जोडण्याबाबत व बेंबाळ उपकेंद्रात सहाय्यक अभियंता कार्यालय सुरू करण्याबाबत तहसिलदार, तहसील कार्यालय, यांचे मार्फत दोन वेगवेगळे निवेदन सादर दिले.
या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की, बेंबाळ येथे पदवीपर्यंतचे शिक्षण आहे तसेच तालुक्यातील ITI मधून उत्तीर्ण झालेले अनेक स्थानिक युवक कामाच्या निमित्ताने स्थलांतरण करत आहेत; कारण स्थानिक पातळीवर त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध नाहीत व त्यांच्या हाताला काम नाही.
जर बेंबाळ येथे MIDC सूरू झाली तर परिसरातील युवकांना रोजगार मिळतील, त्या माध्यमातून बेरोजगारी कमी होईल व स्थलांतरण थांबेल. त्यातून शिक्षण, आरोग्य, इत्यादी सुविधा उपलब्ध होतील व त्यातून स्थानिक जनतेचे जीवनमान सुधारेल. करीता वरील मागणी त्वरीत मान्य करून बेंबाळ येथे MIDC सुरू करण्यात यावी, तसेच
विनंती याप्रमाणे आहे की, बेंबाळ 33 KV उपकेंद्रामध्ये समाविष्ठ गावे हे मूल तालुक्यातील असुन हे उपकेंद्र सावली विद्युत कार्यालयाला जोडलेले आहे.
आमची तहसील, पंचायत समिति व उपविभागीय कार्यालय मूल आहे. आणि या भागातील सर्व जनतेला मूल येथेजाण्याचे वारंवार कामे पडत असतात. पण फक्त विद्युत संदर्भातील कामे करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना सावली येथे जावे लागते. हे करीत असताना शेतकरी व इतर सर्व विद्युत ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. करीता वरील मागणी त्वरीत मान्य करून बेंबाळ उपकेंद्र गूल विद्युत कार्यालयाला जोडण्यात यावे व बेंबाळ उपकेंद्रात सहाय्यक अभियंता कार्यालय सुरू करण्यात यावे, ही नम्र विनंती.
ह्याच निवेदनाच्या प्रतीलिपी
- मान. नाम. देवेंद्रजी फडणवीस,
उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य - मान. नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार,
पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा मंत्री, महाराष्ट्र राज्य - मान. नाम. उदयजी सामंत,
उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य , यांचे नावे पाठविण्यात आले.
याप्रसंगी , संतोष रघुनाथ शनगरवार -बेंबाळ
किशोर गणपत पगडपल्लीवार,मिथुन रमेश गेडाम , रंजित मुरलीधर समर्थ- सरपंच जुनासुर्ला अनिल निलकंठ दुर्गे चक दुगाळा जितेन्द्र चौधरी – नवेगांव , खुशाल टेडाम. उपसरपंच जूनासूर्ला ,मून्ना कोटगले, सुभाष पितांबर सोनुले . आदि उपस्थित होते.






